अशी घ्या ऑटिस्टिक मुलांची काळजी
शी घ्या ऑटिस्टिक मुलांची काळजी 

संभाषण वाढवा
ऑटिस्टिक मुले फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. ती स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे अशा मुलांशी संयमाने वागा. त्यांना सतत गोष्टीगाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे ही मुले समाजात मिसळण्यास मदत होईल. यामुळे सारीच परिस्थिती एकदम बदलणार नाही. परंतु काही प्रमाणात सुधारणा नक्की होईल.

इतरांबरोबर अधिक मिसळू द्या
ऑटिस्टिक मुलांना समाजात किंवा इतरांमध्ये मिळून-मिसळून राहणे फारसे जमत नाही. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. त्यांचा एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी त्यांना नर्सरी किंवा प्ले स्कूलमध्ये पाठवा. तेथे मुले विविध आकाराच्या रंगांच्या खेळण्यांसोबत खेळतील. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल. ऑटिस्टिक मुले काही विशिष्ट रंग किंवा आवाज टाळतात. त्याच्याशी संपर्क आल्यास मुले हिंसक बनतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ नकोत
जंक फूडचे सेवन मानवी शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांमध्येही अशा आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा समावेश टाळा. अशा पदार्थांमुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यवता असते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा
तुमच्या मुलामध्ये ऑटिझमचे निदान झाले असेलतर त्यांना टीव्हीमोबाइलव्हिडिओ गेम अशा वस्तूंपासून दूर ठेवा. कारण अशा उपकरणांच्या वापरामुळेअशा मुलांचा मानसिक विकास खुंटण्याची शक्यता असते. त्यापेक्षा विविध प्रकारची गाणीचांगले शांत संगीतबालगीते त्यांना ऐकवाबौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्या. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल.

औषधांपेक्षा थेरपी प्रभावी
ऑटिस्टिक मुलांमध्ये बदल घडवण्यासाठीऔषधांपेक्षा विविध थेरपीच अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. अॅप्लाइड बिहेव्हिअरल अॅनालिसिस व रिलेशनशिप डेव्हलपमेंट इंटरव्हेंशन या दोन अत्यंत प्रभावी थेरपींचा दिवसातून चार ते पाच वेळा जरूर वापर करा.