उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी  Summer skin care tips in Marathi

बारा महिण्याच्या कालावधीतील आपल्याकडे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे साधारण तीन ऋतू पडतात. या तीन्ही ऋतूंचे आपल्या शरिरावर वेगवेगळे परिणाम होतात. सर्वाधिक ऋतूंचा परिणाम होतो तो म्हणजे आपल्या त्वचेवर ! त्वचेवर परिणाम झाल्यास आपले संपूर्ण दिवसाचे ताळतंत्र बिघडून गेेलेले आपण अनुभवले आहे. मग असे वाटते की, हे ऋतूच जर बदलले नसते तर… मात्र तो निसर्गाचा नियम असल्यामुळे त्यामध्ये तर आपण बदल करणे शक्य नाही. यावर वेगवेगळ्या ऋतूमध्ये उपाय करून त्यावर आपण तोडगा काढू शकतो.

उन्हामध्ये फिरण्याचे यंगस्टर्सचे प्रमाण आज नक्कीच कमी झाले आहे. त्याचे कारण म्हणजे  उन्हामुळे होणारे त्वचेवर होणारे परिणाम. आपण उन्हात फिरत असाल तर काही गोंष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचा आपल्या त्वचेवर फारसा परिणाम होणार नाही. उन्हामुळे आपल्या शरिरामध्ये पाण्याची गरज वाढते. लहान थोरांना उन्हाचा कडाका वाढल्याने घराबाहेर निघण्यास बंदी करण्यात येते. या दिवसात सूर्याची अतिनील किरणे अधिकच तीव्र झालेली असतात. या किरणांचा त्वचेशी थेट संपर्क आला तर त्वचा रापणे, काळवंडणे, शुष्क होणे, सुरकुत्या पडणे असे परिणाम दूरगामी होतात. विशेषतः सनस्क्रीन लोशन रासायनिक द्रव्यांचा वापर असलेली आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केली जातात. प्रत्येकाने आपल्या त्वचेकरिता कोणते सनस्क्रीन क्रीम योग्य आहे हे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घ्यावेत.

उन्हाळ्यामुळे शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होत असते, ते कमी होऊ नये म्हणून दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. त्याचबरोबर शक्यतो उन्हात जाणे टाळावे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राहील आणि उष्णतेपासून आराम मिळेल अशा आहाराची निवड करावी. उन्हाळ्यामध्ये खरबूज, टरबूज, अननस, कलिंगड, संत्रं, मोसंबी, आंबा अशी रसदार फळे खावीत. त्याचबरोबर सनबर्नपासून संरक्षण होण्यासाठी टोमॅटो आपल्या आहारामध्ये घ्यावा. शक्य होईल तसे भरपूर पाणी प्यावे. आहारात पालेभाज्यांचा अधिक वापर करावा.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी Summer skin care tips in Marathi
उन्हाळ्यामध्ये शक्य होईल तेवढे बाहेर जाणे टाळावे. त्याचबरोबर बाहेर जाणे अत्यावश्यक असेल तर मग घराबाहेर जाताना संपूर्ण शरीर झाकून बाहेर पडावे.

सच्छिद्र सुती जाड कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स, छत्री टोपी, बुट किंवा चप्पलचा वापर करावा.

जर दररोज आपण उन्हात काम करत असाल तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या डोक्यात टोपी, किंवा छत्री घ्यावी.

काम करत असताना डोके, मान ओल्या कपड्याने बांधून घ्यावे.

अंघोळ केल्यानंतर आणि घराबाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन क्रीम लावावे

शक्य असल्यास दर तीन-चार तासांनी सनस्क्रीन क्रीम लावा.

जे लोक पाण्यात काम करतात त्यांनी वॉटरप्रूफ क्रीम वापरावे.

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनवर 100 टक्के अवलंबून राहू नये. त्याबरोबरच नेहमी छत्री, स्कार्फ, गॉगल इत्यादी वस्तूंचाही वापर करावा.

अ‍ॅण्टिऑक्सिडंटच्या स्वरूपात ओरल किंवा सिस्टीमिक सनस्क्रीन हे त्वचातज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी.

सूर्यकिरणांच्या परिणामाने त्वचा रापली (सनटॅन) असल्यास साबण किंवा फेसवॉश आणि भरपूर पाण्याने त्वचा धुवावी. त्यावर लगेच मॉइश्‍चरायझर लावावे.

मखमली त्वचेसाठी उपाय-

अर्धा चमचा गुलाबपाणी, एक चमचा मधात मिसळून 15 ते 20 मिनिटे चेह़र्‍यावर लावून ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावेत. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. हा उपाय दररोज करता येण्यासारखा आहे.

पाऊण कप गुलाबपाणी, पाव कप ग्लिसरीन, एक चमचा व्हिनेगर आणि पाव कप मध यांचे एकत्रित मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. हे मिश्रण दररोज क्लिझिंग म्हणून वापरता येते.

केळी कुस्करून त्यामध्ये एक चमचा काकडी आणि गाजराचा रस घालून चेहरा व मानेला मसाज करावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवावा. आठवडयातून एकदा त्वचाशुद्धीकरिता हा मास्क वापरू शकता.